PCMC : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्या; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने तयार (PCMC) होत असलेल्या इमारतीचे काम मुदतीत पूर्ण करण्यात यावे. तसेच प्रत्येक कामगार, अधिकारी कामावर असताना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक शहरध्यक्षपदी शेखर काटे

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  खोराटे यांनी आज (शनिवारी) नव्याने तयार होत असलेल्या महापालिका नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची तसेच भक्ती शक्ती ते मुकाई चौक आणि मुकाई चौक ते भोंडवे कॉर्नर या रस्त्यांची आणि रावेत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी निर्देश दिले.

Pimpri : ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ म्हणत सर्व पक्षीय आणि संघटनांचा मोर्चात सहभाग

प्रकल्पांच्या पाहणीच्या वेळी त्यांचे समवेत सहशहर अभियंता प्रमोदओंभासे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड,उप अभियंता विजयसिंह भोसले,कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे आणि केतकी कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी महापालिका नवीन इमारतीच्या खोदकामाची पाहणी करून प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली.  सहशहर अभियंता  ओंभासे यांनी नवीन इमारतीस 36 महिने लागणार असून सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांनी रावेत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची सखोल माहिती घेतली. सह शहर अभियंता ओंभासे यांनी  मुख्यत्वेकरून जमीन अधिग्रहण करण्यात झालेला विलंब यामुळे या प्रकल्पाचे काम थांबले होते. परंतू आता काम वेगाने सुरू असून पुढील तीन महिन्यात काम पूर्ण होईल असे सांगितले.

त्यानंतर कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड यांनी रावेत येथील उड्डाण पूल ते मुकाई चौक या रस्त्यांची विकास मंजूर आराखड्यातील 45 मीटर रुंदीप्रमाणे अद्यापही काही जागा ताब्यात नसल्याने या रस्त्याचे कामास विलंब झाल्याचे सांगितले.
त्यावर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी या संपूर्ण रस्त्यांची पाहणी करून माहिती घेतली आणि आपल्याला पुढील काळात ते काम तातडीने पूर्ण करायचे आहे असे सांगितले,त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून संपूर्ण प्रकल्प मार्गी लावा असे सांगितले. मुकाई चौक ते भोंडवे कॉर्नर या रस्त्याचे पदपथाचे काम वेळेत पूर्ण करा अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी (PCMC) केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.