NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक शहरध्यक्षपदी शेखर काटे

शहर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) (अजित पवार गट) कार्यकारिणीत जनतेत स्थान असणाऱ्या युवक नेतृत्वास सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या युवक अध्यक्ष पदी शेखर काटे तर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांची आज (शनिवारी) नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडीचे पत्र दिले.

Chinchwad : रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत रेल्वे विभागाला निवेदन

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या युवक नेतृत्वांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे. त्याच भूमिकेतून शनिवार (दि. ०९) युवक अध्यक्षांसह तीन शहर कार्याध्यक्षांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सायांच्या हस्ते तसेच युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रदेश युवक उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, प्रतिक साळुंखे, प्रशांत सपकाळ, माजी नगरसेविका उषा काटे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात राष्ट्रवादी जोमाने वाढावी म्हणून मी कार्यरत राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, युवा नेते पार्थदादा पवार आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ युवकांच्या माध्यमातून वेगाने वाटचाल करेल याची मला खात्री आहे. पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन, असा विश्वास देतो असे काटे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.