Chinchwad : रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत रेल्वे विभागाला निवेदन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबत (Chinchwad) रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने रेल्वेच्या पुणे विभागाच्या मुख्य व्यवस्थापक इंदुमती दुबे यांना निवेदन देण्यात आले. त्यात प्रगती एक्सप्रेसला चिंचवड येथे थांबा देणे, सिंहगड एक्सप्रेसला पासधारक महिलांसाठी व्यवस्था करावी. अर्धी बोगी पास धारकांसाठी राखीव ठेवावी. दुपारच्या वेळेत पुणे-लोणावळा मार्गावर लोकल सुरू करावी. डेक्कन क्वीन एक्सप्रेस व इतर पुणे मुंबई धावणाऱ्या एक्सप्रेसमध्ये पासधारकांसाठी राखीव डब्यांमध्ये नियमित तपासणी व्हावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

Pimpri : ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ म्हणत सर्व पक्षीय आणि संघटनांचा मोर्चात सहभाग

इंदुमती दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बशीर सुतार यांनी निवेदन दिले. यावेळी डॉ. मिलिंद हिरवे, सीनियर डीसीएम स्वप्निल नीला, सीनियर डिव्हिजन ऑपरेशन्स तसेच डीआरयुसीसी सदस्य श्रीयुत माने, श्रीयुत काची, श्रीयुत बियाणी, इक्बाल भाईजान मुलाणी, श्रीयुत बटाला, श्रीयुत चौगुले, आप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्सप्रेस (12125/12126) ला पुणे स्थानकानंतर थेट लोनावळा येथे थांबा आहे. या गाडीला शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यानच्या प्रवाशांना कनेक्टेड लोकल नाही. यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणे येथून 6.30 ला सुटणारी लोकल पकडावी लागते आणि तासभर लोणावळा स्टेशन येथे ताटकळत थांबावे लागते. यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. पुणे शहरालगत असणारे पिंपरी-चिंचवड शहर हे मोठे औद्योगिक नगर असून त्याची लोकसंख्या सुमारे चाळीस लाख इतकी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज हजारो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. सकाळी सिंहगड एक्सप्रेस गेल्यानंतर मुंबईला जाणारी दुसरी गाडी सुमारे दहा तासानंतर म्हणजे दुपारी 4.15 ला कोयना एक्सप्रेस ही आहे. यामुळे 10 तासांच्या या मधल्या कालावधीत लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड येथील प्रवाशांचा त्रास कमी (Chinchwad) करण्यासाठी आणि त्यांना एक चांगली सुविधा देण्याकरिता प्रगती एक्सप्रेसला चिंचवड स्थानकात थांबा देण्यात यावा.

पिंपरी-चिंचवड, तळेगाव येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असून लाखो कामगार येथे काम करत आहेत. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पुणे ते लोनावळा दरम्यानच्या प्रवाशांची संख्या विचारात घेता लोणावळा ते पुणे दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी वर्ग यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल.

Thergaon : स्वस्तात कार मिळवून देतो म्हणून नागरिकाची लाखांची फसवणूक

लोणावळा स्थानकातून सकाळी 10.05 वाजता पुणे करिता लोकल आहे. यानंतर सुमारे थेट पाच तासानंतर दुपारी 2.50 वाजता दुसरी लोकल आहे. लोणावळा येथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असल्यामुळे देहूरोड ते लोणावळा दरम्यानचे हजारो विद्यार्थी दररोज लोणावळा येथे शिक्षणाकरिता येतात. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा/काॅलेज हे दुपारी 12.00 च्या दरम्यान सुटतात. यामुळे लोणावळा ते देहूरोड दरम्यान (Chinchwad) राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन तास ताटकळत लोणावळा स्टेशन येथे थांबावे लागत आहे. यामुळे या मोकळ्या वेळात विद्यार्थी वाम मार्गाला लागण्याची तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता आहे. एवढा वेळ स्टेशनवर थांबणे विद्यार्थींनींच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे असून असुरक्षिततेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाया गेल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी दुपारी 12.30 ते 1.00 च्या दरम्यान लोणावळा ते पुणे अशी लोकल सोडणे गरजेचे आहे.

इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस या चारही गाड्यांनी पुणे-मुंबई रोज हजारो प्रवासी प्रवाशी करत असतात. या सर्व एक्सप्रेसमध्ये पासधारक महिलांसाठी विशेष पासधारकांसाठी राखीव (MST) डबे आहेत. सिंहगड एक्सप्रेस मुंबईला सकाळी जाणारी पहिली गाडी असल्यामुळे या गाडीला खूप प्रमाणामध्ये गर्दी असते. या सिंहगड एक्सप्रेसला मासिक पासधारकांसाठी एकही स्वतंत्र डबा देण्यात आलेला नाही. वरील एक्सप्रेसप्रमाणे सिंहगड एक्सप्रेसला किमान अर्धा डबा मासिक पासधारक महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावा.

डेक्कन क्वीन एक्सप्रेस या गाडीला एकच जनरल डबा असल्याने तिकीटधारक प्रवाशी पासधारकांच्या डब्यात येतात व वाद घालतात. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या पासधारकांना नाहक त्रास होतो, वेळप्रसंगी मारहाणीच्या घटनाही घडतात. त्यासाठी मासिक पासधारकांच्या डब्यात सकाळी व संध्याकाळच्या वेळेस नियमितपणे तिकीट/पास तपासणी करण्यात यावी. तसेच, पुणे स्टेशन येथे सोमवारी सकाळी आरपीएफ तैनात करण्यात यावे. यामुळे MST मध्ये फक्त पासधारकच बसतील. पुणे लोणावळा लोकल या कोविड नंतर अजुनही सबअर्बन स्पेशल म्हणूनच सुरु आहेत. त्यामुळे सर्व लोकल पूर्वीप्रमाणे 99 पासुन सुरु होणाऱ्या नंबरने सुरु (Chinchwad) कराव्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.