Thergaon : स्वस्तात कार मिळवून देतो म्हणून नागरिकाची लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  स्वस्तात कार देतो म्हणत एका (Thergaon ) नागरिकाची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर 2020  ते आजपर्यंत थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी  साचिन शाहू शिखरे (वय 39  रा. थेरगाव) यांनी शुक्रवारी ( दि.8) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अनिल चौधरी त्याची पत्नी व मंजित कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवड बंद यशस्वी; मराठा क्रांती मोर्चाचे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत स्वस्तात कार मिळवून देण्याच्या बहाण्याने 11 लाख रुपये घेत दुसऱ्याच्या नावावर असलेली गाडी देतो म्हणाले. तसेच फिर्यादी यांनी दिलेल्या पैशातून कर लोन फेडू असे सांगितले. मात्र बँकेचा 4 ते 5 हप्ते भरले नाहीत. त्यामुळे बँकेने कार जप्त केली. यावरून फिर्यादी यांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली असून वाकड पोलीस पुढील तपास करत ( Thergaon ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.