Metro News : रविवारी सकाळी एक तास उशीराने सुरु होणार मेट्रो

एमपीसी न्यूज – मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी (Metro News) आहे. रविवारी (दि. 9) सकाळी सहा ऐवजी मेट्रो सात वाजल्या पासून सुरु होणार आहे. सकाळी सहा ते सात या कालावधीत मेट्रो बंद राहणार आहे. 

तांत्रिक कारणांसाठी केवळ एक दिवसासाठी मेट्रोने हा बदल केला आहे. लाईन – 1 (पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक) व लाईन – 2 (वनाझ ते रुबी हॉल मेट्रो स्थानक) या दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा एक तास विलंबाने सुरु होणार आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवड बंद यशस्वी; मराठा क्रांती मोर्चाचे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रविवारी पुणे मेट्रोची वारंवारता पुढीलप्रमाणे –

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी 7 ते 8 – दर 15 मिनिटांनी
सकाळी 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी

Pimple Gurav : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करत कोयत्याने तोडफोड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग 

सकाळी 7 ते 8 – दर 15 मिनिटांनी
सकाळी 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.