Pimpri : पिंपरी-चिंचवड बंद यशस्वी; मराठा क्रांती मोर्चाचे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा (Pimpri) समाजाच्या वतीने शनिवारी पुकारलेल्या पिंपरी-चिंचवड बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. बंद यशस्वी झाला. या आंदोलनात दीडशे पेक्षा अधिक संघटना,  कामगार चळवळीतील नेते, सर्वपक्षीय आजी-माजी आमदार, नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Nana Pateker : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुधीर मुनगंटीवारांना नाना पाटेकरांनी लगावला टोला

आंदोलकांनी विविध मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने करत आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने शांततेत निघालेले 58 मूक मोर्चे महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत. या मागणीसाठी आजवर 42 च्या  वर मराठा तरुणांनी आत्मबलिदान दिले आहे. समाजाच्या विविध  मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी जालना जिल्ह्य़ात  अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील व सहकारी  शांततेत आंदोलन करत होते.

एक सप्टेंबर रोजी या आंदोलकांवर पोलीसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. याच्या  निषेधार्थ मराठा समाज राज्यभर विविध आंदोलने करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शनिवार  मराठा क्रांती मोर्चाने पिंपरी चिंचवड शहर बंदचे आवाहन केले होते. यास शहर बंद ठेवून नागरिकांनी प्रचंड (Pimpri) पाठिंबा दिला. तसेच आंदोलकांनी पायी महामोर्चा  काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुतळा चौक, पिंपरी-चिंचवड येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित आंदोलकांनी धरणे आंदोलन केले.

Chakan : चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेकडून अखंडीत वीजपुरवठा करण्याची मागणी

मराठा क्रांती  मोर्चाच्या मागण्या

. मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण द्यावे.
. जातीनिहाय जनगणना करावी.
. एकाच पक्षाचे असलेले केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने हालचाली करून आरक्षण मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत, मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. समाजाची दिशाभूल करू नये.

. आंदोलकांवर झालेल्या झालेल्या लाठी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी राज्य सरकारने करावी.
.  अमानुष लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.
.  मराठा आरक्षण आंदोलकावर आजवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.
.  निगडी येथील भक्ती शक्ती समुहशिल्पा लगतची पेठ क्र.24 सर्वे क्र.12,13 ,14 येथील पीएमआरडीएची साडेतीन एकर जमीन “शिवसृष्टी” व महापुरुषांच्या जयंती उत्सव व इतर सर्व सार्वजनिक उपक्रमांकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी.

तरी आपणास विनंती करण्यात येते की आपण वरील मागण्या व्यक्तीशा लक्ष देवून तातडीने पूर्ण ( Pimpri ) कराव्यात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.