Chakan : चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेकडून अखंडीत वीजपुरवठा करण्याची मागणी

एमपीसी न्यूज –  चाकण (Chakan) एमआयडीसी व परिसरामधील सर्व उद्योजक वारंवार वीज जात असल्यामुळे खूप त्रस्त आहोत. सरासरी 2-3 तास प्रती दिवस मागील 3 महिन्यापासून वीज जात आहे. तसेच वीज गेल्यावर पूर्वीप्रमाणे प्रतिसाद देखील कर्मचाऱ्यांकडुन मिळत नाही. तसेच दर गुरुवारी नियमित शट डाऊन असते. चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेकडून अखंडीत वीजपुरवठा करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अभियंता व ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

Pimple Gurav : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करत कोयत्याने तोडफोड

या निवेदनावर MSEDCL एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर राजेंद्र एडके यांनी संपूर्ण बाजू उद्योजकाची ऐकून घेतली व त्यावर ती त्यांनी दोन महिन्यांमध्ये अशा प्रकारे ह्या सर्व अडचणी दूर होऊन अखंडितपणे वीज पुरवठा चाकण एमआयडीसी व परिसरामध्ये होईल याकरिता नियोजन दिले. निवेदन देताना शेकडो उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते. यावरती काही उपाययोजना MSEDCL अधिकाऱ्यांकडून न झाल्यास संघटनेकडून कडक पावले उचलली जाणार आहेत.

उद्योजक जयदेव अक्कलकोटे म्हणाले, आम्हा सर्व उद्योजकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे तसेच आमचा जो ग्राहक आहे त्याचे देखील अतोनात नुकसान होत आहे व याचा दूरगामी परिणाम आमच्या व्यवसायावर होत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होत आहे. काही कंपन्यांमध्ये विजेची अडचण झाली तर संपूर्ण फीडरला कनेक्ट असलेल्या उद्योजकांची लाईट जाते.

3-4 वर्षापूर्वीच तत्कालीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी RMU करता प्रयत्न करून संपूर्ण चाकण MIDC व परिसरात RMU लावून घेतले. जेणेकरून कुठे काही फॉल्ट झाला तर फक्त तेवढीच लाईन किंवा तेवढ्याच कंपनीच्या वीज पुरवठा बंद होईल. संपूर्ण परिसरामध्ये वीजपुरवठा हा सुरळीत राहील. मात्र सध्या तसे होत नाही आहे. MSEDCL ने आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती जोमाने काम करणे गरजेचे आहे. जेणेकरून कमीत कमी ब्रेक डाऊन होऊन लवकरच Zero Break Down कडे आपली वाटचाल होईल.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.