Pimple Gurav : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करत कोयत्याने तोडफोड

एमपीसी न्यूज –  दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून  (Pimple Gurav ) मारहाण करत कोयत्याने घराची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी ( दि.8) पिंपळे गुरव येथे घडली.

Nana Pateker : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुधीर मुनगंटीवारांना नाना पाटेकरांनी लगावला टोला

विनोद शिवाजी जाधव (वय 34 रा.पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अक्षय दशरथ शिंदे (वय 23 रा.पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते मात्र फिर्यादीने त्याला नकार दिला यावेळी आरोपीने शिवीगाळ करत आरोप फिर्यादीच्या अंगावर धावून आला यावेळी फिर्यादी घाबरून बाथरूम मध्ये जाऊन लपले असता आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने बाथरूमच्या दरवाजावर वार केले.

तसेच घरातील काचांच्या खिडक्या दरवाजांवर कोयत्याने वार करून तोडफोड केली. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Pimple Gurav ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.