Vadgaon Maval : शरद पवार यांच्यावरील ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी मावळ बंद

एमपीसी न्यूज- शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ईडी मार्फत झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी (दि.26) मावळ बंदची हाक देण्यात आली आहे अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली आहे.

बबनराव भेगडे म्हणाले, ” शरद पवार हे कधीही शिखर बँकेच्या संचालक मंडळावर नसतानाही ईडी ने जाणीवपूर्वक त्यांचे नाव या कथित घोटाळ्यामध्ये जोडले आहे. आज आम्ही मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला आहे. मात्र उद्या या कारवाईच्या निषेधार्थ मावळ बंदची हाक देण्यात येत आहे. सर्व मावळवासीयांनी, व्यापारी, व्यावसायिक व कारखानदारांनी सर्व व्यवहार बंद ठेवून या बंदला पाठिंबा देऊन सहकार्य करावे” असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.