Vadgaon : वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन अ‍ॅक्टिव्ह मोडवर

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 16-मध्ये मागील एक ( Vadgaon ) वर्षापासून खंडोबा मंदिर ते एमआयडीसी रोड पर्यंतच्या साखळी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामास काही ठिकाणी नागरिकांनी अडवणूक केल्याने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात खड्ड्यांतून जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी ऑन फिल्डवर येऊन  एमआयडीसीकडे जाणाऱ्या साखळी रस्त्याची पाहणी केली.

यावेळी मा.उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर,अभियंता अनिल कुंभार, समाधान पवार उपस्थित होते.

Talawade : भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; दुचाकी वरील तरुणाचा मृत्यू 

रस्ता रुंदीकरणास येणारा अडथळा संबंधित शेतकऱ्यांना आवाहन करून त्वरित काढून टाकण्यात सांगण्यात आला तसेच उर्वरित रस्त्याच्या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून नुकतीच मोजणी करण्यात आली असून लवकरच रस्त्याची हद्द निश्चित करून त्या ठिकाणचे ही काम पूर्ण करण्यात येईल.

तसेच पुढील काळात रस्त्याच्या कामास अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून नगरपंचायत मार्फत त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुख-सुविधा बंद करण्यात येईल असा इशारा निकम यांनी यावेळी बोलताना दिला.

याप्रसंगी रस्ता रुंदीकरणास विशेष सहकार्य केल्याबद्दल उद्योजक मंगेश काका ढोरे यांचे आभार  ( Vadgaon ) मानण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.