Vadgaon : वडगाव नगर पंचायतचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा – शहर भाजपाचा आरोप

एमपीसी न्यूज  – वडगाव मावळ नगरपंचायतने शहराचा विकास आराखडा ( Vadgaon) नुकताच सादर केला. या विकास आराखड्यावर शहर भाजपने आक्षेप घेतला आहे. हा विकास आराखडा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसून तो केवळ बिल्डर धार्जिणा असल्याचा आरोप शहर भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच काही प्रस्तावांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

याप्रसंगी मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा उप सभापती गणेशआप्पा ढोरे,मनसे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,मा प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर, सचिन(बाळा) ढोरे,मा अध्यक्ष सोमनाथ ढोरे,किरण भिलारे,मा नगरसेवक किरण म्हाळसकर,भुषण मुथा,शरद मोरे,रविंद्र म्हाळसकर, गणेश भेगडे,युवक अध्यक्ष विनायक भेगडे, सरचिटणीस मकरंद बवरे, वडगाव मनसे अध्यक्ष तानाजी तोडकर,शांताराम म्हाळसकर,मा ग्रामपंचायत सदस्य,महादू कुडे,महेंद्र म्हाळसकर,प्रफुल कुलकर्णी आदिजण उपस्थित होते.

Today’s Horoscope13 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 वडगांव मावळ सोमवार (दि 11) शहरातील शेतकरी व व्यापारी यांच्या बचावार्थ शहर भाजपा पदाधिकारी यांनी नगर पंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण निकम यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेतली असताना देखील,स्थानिक भूमिपुत्र यांच्या फायद्याचा कोणताही विचार न करता बिल्डर धार्जिणा विकास आराखडा (DP प्लॅन) बनविण्यात आला असा आरोप केला आहे, विकास आराखडा होतं असताना कोणते प्रस्ताव नुकसानकारक आहेत,कोणत्या प्रस्तावांमध्ये बदल करणे जरुरी आहे तसेच कोणत्या प्रस्तावांची अजिबातच गरज नाही याचे विस्तृत विवेचन केले.

यामध्ये प्रामुख्याने वडगाव बाजार पेठेतील रस्ता हा 15 ते 18 मीटर रुंदीचा केलेला असून तो 10 ते 12 मीटरचा असावा. मागील 10 वर्षांमध्ये जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर झालेल्या ओपन स्पेस एमिनिटी स्पेस ह्या जागा आपण प्रथम पब्लिक युटीलिटी, म्हणजेच क्रिडांगण,अथवा गार्डन,व्यायामशाळा, वा अन्य बाबींसाठी,नागरिकांच्या सोयीकरिता ताब्यामध्ये घ्याव्यात तसेच स्थानिक शेतकरी यांनी अनेक वर्षांपासून जपून ठेवलेल्या जमिनींवर टाकलेले आरक्षण काढून, ते त्वरित रद्द करावे.

आंबेडकर कॉलनी मधील,हातावर पोट भरणारे गोरगरीब जनतेच्या घरावर पार्किंग व किफायतशीर घरे याकरिता आरक्षित दाखवले आहे, ते सुद्धा रद्द करणेत यावे. शेतकऱ्यांच्या माळरान सपाट जमिनीवर वनीकरण असा शेरा दिसत असून तो सुद्धा रद्द करणेत यावा. अशा प्रमुख मुद्याचा गांभीर्याने विचार करून वडगाव मधील सर्व सामान्य कामगार वर्ग, शेतकरी आणि व्यापारी यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वडगाव शहर भाजपाने निवेदनद्वारे व प्रत्यक्ष बोलून मुख्याधिकारी प्रविण निकम यांचेशी सकारात्मक चर्चा ( Vadgaon) केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले.

यावेळी निवेदनावर स्थानिक  व्यापारी व शेतकरी यांचे सह्या घेऊन निवेदन देण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.