Vadgaon : सततच्या खंडित वीजपुरवठ्याला कंटाळून व्हॅलेंटाईन डे दिवशी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प आणि मागणीचे निवेदन

एमपीसी न्यूज – वडगाव शहर परिसरात सतत खंडित वीजपुरवठा (Vadgaon)होत आहे. तो सुरळीत व्हावा तसेच स्मशान भूमीतील रोहित्र दुरुस्त करावे, यासह विविध मागण्यांसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून(शरद पवार गट) महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यासह व्हॅलेंटाईन डे निमित्त महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देखील देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वडगांव मावळ येथे (Vadgaon)बुधवार (दि 14)शाखा अभियंता मनोज नेमाडे व कनिष्ठ अभियंता राहुल लकडे यांना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याबाबत निवेदन व गुलाब पुष्प दिले.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिलेसह मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव पंकज भामरे,वडगाव शहर राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष सौरभ सावले,शैलेश खैरे,अभिषेक ढोरे उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 6 व 7 मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसर,खंडोबा मंदिर परिसर, मल्हार रेसिडेन्सी,एकविरा नगर कॉलनी, लक्ष्मी नगर कॉलनी व परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी विद्युत पुरवठा खंडित होऊन नाहक या समस्येला रोज तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण परिसरात दररोज सकाळची वीज खंडित होत आहे. विद्यार्थी, कामगार वर्ग, महिलांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे या कार्यक्षेत्रात रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल देखील असून त्याचबरोबर तालुका कृषी ऑफिस देखील या परिसरात आहे, अनेक बंधू-भगिनी घरूनच वर्क फ्रॉम होम करत आहेत व इतर छोटे मोठे व्यावसायिक हे देखील त्रस्त झालेले आहेत.

Pune : मेधा कुलकर्णी यांना भाजपने न्याय दिला

१) वडगाव मावळ स्मशानभूमीतील जो डीपी बॉक्स आहे तो नादुरुस्त अवस्थेत आहे तो बॅाक्स बदलावा.
२) अनेक ठिकाणी खांबावरील तारांना झोळ निर्माण झाल्यामुळे वारंवार फ्युज जात आहे.
३) वडगांव स्मशानभूमी जवळील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी.
४) उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मर गरम होऊन त्यामधून ऑइल बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्याला ट्रान्सफॉर्मर कव्हर बसून घ्यावेत आशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

येणाऱ्या काळात जर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.