Pune : मेधा कुलकर्णी यांना भाजपने न्याय दिला

एमपीसी न्यूज – 2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीत (Pune)भाजपने प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. तेव्हापासूनच कुलकर्णी या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलूनही दाखविली होती. आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत इतर उमेदवारांना संधी देण्याच्या दृष्टीने कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

तर, पक्ष निष्ठा पाहून आपल्याला संधी मिळाल्याचे कुलकर्णी (Pune)यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कोथरूडच्या माजी आमदार प्रा. कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कुलकर्णी इच्छुक असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन पक्षाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या उमेदवारीमुळे लोकसभा निवडणुकीची राजकीय गणितेही बदलणार आहेत.

Shirgaon : गावठी दारू भट्टीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा

राज्यसभेसाठीच्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा भाजपकडून बुधवारी करण्यात आली. त्यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महानगपालिकेच्या मिळकतकर विभागाकडे ‘नो ड्यूज ’ सर्टीफिकेटसाठी मंगळवारी अर्ज केला आहे. कुलकर्णी यांनी अचानकपणे महापालिकेकडे हा अर्ज केल्याने त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती.

2019 मध्ये पक्षाने अचानक त्यांना उमेदवारी नाकारल्याने या भागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. पण, समाजमाध्यमातून त्यांनी सातत्याने सूचक संदेश दिले होते. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगीही त्यांना निमंत्रण न दिल्यावरून मानापमान नाट्य रंगले होते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी त्यांची समजूत काढली होती. पक्षात नाराज असल्या तरीही प्रा. कुलकर्णी यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला होता. त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल संपूर्ण पुणे शहरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.