Maval : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलकांना अखेर न्याय मिळाला – रविंद्र भेगडे 

एमपीसी न्यूज – सन 2011 साली बंदिस्त पवना जलवाहिनी विरोधात ( Maval) झालेल्या आंदोलनात 117 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेरा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर या आंदोलनातील सर्व आंदोलकांची निर्दोष सुटका झाली. दरम्यान या कालावधीत 117 आंदोलकांपैकी 27 आंदोलक मयत झाले आहेत. अखेर पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलकांना न्याय मिळाला असल्याची भावना रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केली.

मावळ तालुक्याचे भाग्यविधाते, मा.आमदार स्व.दिगंबर दादा भेगडे आणि खासदार स्व.गजानन बाबर हे देखील आंदोलकांमध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन लढले. त्यांचेही आज स्मरण या ऐतिहासिक निकालानंतर होत आहे.

Vadgaon : वडगाव नगर पंचायतचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा – शहर भाजपाचा आरोप

ही कायदेशीर लढाई तब्बल 13 वर्षे आम्ही सर्वांनी मिळून लढली आणि आज सर्व आंदोलक शेतकऱ्यांची न्यायालयाच्या प्रक्रियेतून निर्दोष सुटका झाली हा एकप्रकारे नियतीचा न्याय आहे.

मावळ तालुक्यातील नैसर्गिक संसाधनावर सर्वांत पहिला हक्क येथील स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. आमच्या मावळवासीयांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या बंदिस्त पवना जलवाहिनीला विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे हे मी निक्षून सांगतो.

13 वर्षांपूर्वी आम्ही मावळवासियांनी मिळून जो लढा उभारला त्यामुळे आजही पवनेचे पाणी मावळातील शेती-वाडी फुलवत आहे. जो पर्यंत बंदिस्त जलवाहिनी हा विषय कायमस्वरूपी बासनात जात नाही तोपर्यंत मी आणि माझे संपूर्ण मावळवासी शांत बसणार नाही ( Maval) हा शब्द देतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.