Mumbai : मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांच्या नावांत होणार बदल

एमपीसी न्यूज –  मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांच्या नावांत बदल होणार ( Mumbai) आहे  शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्री मंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

Maval : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलकांना अखेर न्याय मिळाला – रविंद्र भेगडे 

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे, या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर होईल, असंही राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. ज्या-ज्या मागण्या आल्या आहेत, त्यानुसार ती नावांची बदल करण्यात येईल, असं शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे  यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ( Mumbai)  अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशनची नवीन नावे  

1. करी रोड – लालबाग
2. सँडहर्स्ट रोड – डोंगरी
3. मरीन लाईन्स – मुंबादेवी
4. चर्नी रोड – गिरगाव
5. कॉटन ग्रीन -काळाचौकी
6. डॉकयार्ड – माझगाव
7. किंग्ज सर्कल – तीर्थंकर पार्श्वनाथ
8. मुंबई सेंट्रल – नाना जगन्नाथ शंकरशेट

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.