Pune : दुचाकीला धक्का देत दाम्पत्याकडून आठ लाखांची रोकड हिसकावून चोरटे पसार

एमपीसी न्यूज – केशवनगरला निघालेल्या दांपत्याचा चोरट्यांनी ( Pune ) पाठलाग करून पैशांनी भरलेली बॅग हिसकावून नेली. बॅगेत सव्वाआठ लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. ही घटना खराडी येथील बाह्यवळण रस्त्यावर मंगळवारी भरदिवसा घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश नामदेव खंकाळ (वय 45 , रा. शितळानगर, जयसिंग हाऊसजवळ, देहू रस्ता) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंकाळ पुणे स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहेत. लोणीकंद परिसरात जागेचा व्यवहार करण्यासाठी त्यांनी बँकेमधून आठ लाख 16 हजार रुपये काढले.

Mumbai : मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांच्या नावांत होणार बदल

ही रक्कम पिशवीतून घेऊन खंकाळ दांपत्य दुचाकीवरून खराडी बाह्यवळण चौकातून केशवनगरकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. एका बिअर शॉपीसमोरील खंकाळ दांपत्य दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर लगेचच चोरटे ती पिशवी हिसकावून पसार झाले. या पिशवीत आठ लाख 16 हजारांची रोकड, आधारकार्ड आणि धनादेश होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाले असून, त्याआधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी शेगर करीत ( Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.