Pune : मजुराच्या डोक्यात वीट मारुन खून

एमपीसी न्यूज -जुन्या भांडणातून बांधकाम मजुराच्या (Pune) डोक्यात सिफोरेक्स ब्रिक्स ही वीट मारुन त्यास जखमी करुन त्याचा खून करण्यात आला. खुनी सुध्दा बांधकाम मजूर असून पळून गेला. आज दुपारी सिंहगड रोडवर नांदेड सिटीच्या अलीकडे  बांधकामाच्या ठिकाणी ही दुर्घटना झाली.

पिंटु गौतम दास (वय 28, सध्या रा. बांधकामाच्या ठिकाणी, मूळ -हिल्ली पुर्बा अप्तर, थाना जि. दक्षिण दिनाजपुर, पश्चिम बंगाल ) असे खून झालेल्याचे नाव आहे.पिंटू याचा भाऊ छोटु गौतम दास (वय23 , धंदा-मजुरी, रा. सध्या वानवडी) याने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून  एजाज उल महंमद हसिब आलम (मूळगाव बिहार राज्य) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Pune : दुचाकीला धक्का देत दाम्पत्याकडून आठ लाखांची रोकड हिसकावून चोरटे पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी यांच्यात काही कारणाने रविवारी वाद झाले होते. याच रागातून आरोपीने कामावर असताना चंद्रकांत देडगे यांच्या बिल्डींग बांधकामावरील 5  व्या मजल्यावर एजाज याने पिंटू याच्या डोक्यात वीटांनी घाव घातले.‌ यात पिंटू हा गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील (Pune) तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.