Today’s Horoscope13 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 13 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख -13.03.2024.

शुभाशुभ विचार – 15 पर्यंत चांगला.

आज विशेष – विनायक चतुर्थी.

राहू काळ – दुपारी 12.00  ते  1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – अश्विनी 18.25 पर्यंत नंतर भरणी.

चंद्र राशी – मेष.

—————————–

मेष – ( शुभ रंग – निळा)

आज खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल. व्यवसायातील स्पर्धेला सकारात्मकतेने तोंड द्याल. इतरांना दिलेले शब्द पाळण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुठेही आपलीच मर्जी चालवायचा तुमचा प्रयत्न राहील. तरुणांना प्रलोभने आकर्षित करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

मिथुन – ( शुभ रंग- चंदेरी)

मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. आपल्याकडे मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल. आज हार्डवर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल असेल.

कर्क – (शुभ रंग – सोनेरी)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टींना आज तुम्ही कमी महत्त्व द्याल. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

सिंह -( शुभ रंग – पिस्ता)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% राहील नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी असेल नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती आध्यात्मिक होतील.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

ताकही फुंकून प्यावे असा आजचा दिवस. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह नको. धाडसाची कामे टाळलेली बरी. आज कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सदैव सतर्क रहा.

वृश्चिक – ( शुभरंग – गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी सोपवलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंग तुम्ही यशस्वीरित्या सोडवू शकाल.

धनु – (शुभ रंग- भगवा) 

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटण्याजोगी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. विद्यार्थी आज फक्त अभ्यासाला महत्त्व देतील.

मकर- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच. गृहसौख्य लाभेल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचे प्रवास घडू शकतात. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आज काही फायदेशीर ओळखी होतील. गृहिणी शेजार धर्म पाळतील.

मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील. धंद्यातील थकलेली येणी वसूल होतील. मुले आज्ञाधारकपणे वागतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.