Pimpri : पुनावळे आणि चिखलीच्या विकास आराखड्यातील रस्त्याच्या जागेचा आगाऊ ताबा

एमपीसी न्यूज – पुनावळे आणि चिखलीतील विकास आराखड्यातील (Pimpri) रस्त्याच्या जागेचा आगाऊ ताब्यात घेण्यात आला आहे. त्यासाठी शिबिर घेण्यात आले  होते.

यामध्ये मौजे वाकड ,ताथवडे, पुनावळे, रावेत,मामुर्डी व किवळे येथील मंजुर विकास योजनेमधील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूस 12 मीटर सेवा रस्ता, चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा 12मी/18 मी रुंद डी.पी. रस्ता, चिखली येथील साने चौक ते चिखली गाव 12 मी, 24 मी व 30 मी रुंद रस्ता,

चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा 30 मी रुंद डी.पी. रस्ता, चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा 24 मी रुंद रस्ता, तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत 24 मी रूंद उर्वरित रस्ता, तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा 18 मी डी.पी. रस्ता, तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा 12 मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील 24 मीटर रस्त्याची जागा ताब्यात घेण्यात आली.

PMPML : महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीएमएलकडून महत्वाच्या बस स्थानकावरून बसेसचे नियोजन

जमीन मालक / विकसक जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते. नगररचना विभागाने तयार केलेल्या नकाशा पाहून आपली जागा रस्त्याचे संपादनात येत असल्याची खात्री झाल्यानंतर कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करून जागेचा आगाऊ ताबा दिला. महापालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे “अ” व “ब” प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले.

दोन्ही ठिकाणचे जागेचे मालकांनी उर्वरित क्षेत्र ही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे. या शिबीरामध्ये काही कारणास्तव उपस्थित न राहता आलेमुळे “अ” व “ब” प्रपत्र न मिळाल्यास संबंधित जमिनमालकांनी महानगरपालिकेतील नगररचना व विकास विभागात संपर्क साधण्याचे आवाहन  (Pimpri) केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.