PMPML : महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीएमएलकडून महत्वाच्या बस स्थानकावरून बसेसचे नियोजन

एमपीसी न्यूज – महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सोयीसाठी (PMPML) येत्या शनिवारी (दि.8) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये शहरातून तसेच उपनगरातून अनुक्रमे निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून खाली नमूद केलेल्या बसस्थानकांवरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Express Way Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

अ.क्र. स्थानकाचे नाव मार्ग

1. कात्रज सर्पोद्यान कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा पर्यंत)

2.  स्वारगेट मुख्य स्थानक स्वारगेट ते निळकंठेश्वर (रूळेगांव)

3.  निगडी (पवळे चौक) निगडी (पवळे चौक) ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी)

1)      कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे 5.30 वा. असून यात्रेसाठी 2 जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक 61,293 , 296 व 296 -अ या मार्गांवर 11 बसेस सरासरी 20 मि. वारंवारितेने उपलब्ध असणार आहे.

2) स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (रूळेगांव) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे 3.30 वा. असून यात्रेसाठी 12 जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक 52 -अ या मार्गावर 2 नियमित व जादा क्रु च्या बसेस सरासरी 15 ते 20 मि. वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

3) निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे 5..20 मि.

असून सदर ठिकाणी जाण्याकरीता पर्यायी बसमार्ग क्रमांक 305, 341, 342,368 व 371 या 5 मार्गांवर एकूण 20 बसेस सरासरी 10 ते 15 मि. वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी तीनही बसस्थानकांवरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले (PMPML) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.