Vadgaon : पुर्ववैमनस्यातून सराईताचा हत्याराने वार करत खून

एमपीसी न्यूज – वडगाव शेरी परिसरात एका सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने (Vadgaon) वार करत खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.1) रात्री वडगाव शेरी येथील ब्रम्हा सनसिटी सोसायटीजवळ घडली.

अभिषेक दत्तू राठोड (वय 22) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akurdi : आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयावर मराठा समाजाचा मोर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा देखील (Vadgaon) पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो बुधवारी रात्री वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत परिसरातून निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला अडवले. राठोड याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना दोन दुचाकी व एक हत्यार मिळाले आहे.

राठोडला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राठोड याचा खून वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र पुणे शहरात मागील दोन दिवसात खूनाची ही तीसरी ते चौथी घटना आहे. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेबाबात प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.