Pune news: ‘पुण्यातील नदीचे पुनरुज्जीवन’ या संकल्पनेवर भारत नदी सप्ताहमध्ये 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान होणार विविध उपक्रम

एमपीसी न्यूज : भारत आणि पुण्यातील नद्यांच्या दयनीय स्थितीची (Pune news) आपल्याला कल्पना आहे. पुण्यात समृद्ध नैसर्गिक संसाधने असूनही जलद शहरीकरण हे आपल्या नद्यांच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. अत्याधिक प्रदूषण, अपुरी सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमण, धरणांमुळे नद्यांमधील मर्यादित पाणी यामुळे सर्व प्रवाह थांबत आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थिती आणि त्याचे परिणाम याबद्दल नागरिक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. नद्या केवळ मानवालाच जीवन देत नाही तर या ग्रहावरील मानवाशिवाय इतर जीवनालाही आधार देतात हे आपण विसरलो आहोत. आपल्या नद्यांशिवाय आपल्याला पुरेसे पिण्याचे पाणी मिळणार नाही आणि आपण मोठ्या प्रमाणावर जैवविविधता गमावू. वातावरणातील बदल आपल्या घरात केव्हाच शिरले आहेत हे आपण विसरत चाललो आहोत. जर आपण आपल्या नद्यांची काळजी घेतली तर त्या पाणी, अन्न यांची सुरक्षितता देतील तसेच पुराचा धोकाही कमी करतील.

या समस्येचे गांभीर्य समजून गेल्या काही वर्षांपासून अनेक संस्था पुणे आणि आसपासच्या नद्यांवर (Pune news) काम करत आहेत. मात्र जनजागृती कमी पडत आहे. जीवित नदी 2015 पासून मुठाई महोत्सव साजरा करत आहे. परंतु यावर्षी ‘आओ नदी को जाने’ आणि ‘भारत नदी सप्ताह’ या बॅनरखाली अनेक संस्थांनी नदी उत्सव साजरा करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. पुणे महानगरपालिका (पीएमसी) कार्यक्रम स्थळासाठी आवश्यक मदत देण्यासाठी आणि त्यांच्या प्राथमिक शाळांशी जोडण्यासाठी पुढे आली आहे.

लव्ह-जिहाद विरोधात चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणीच्यावतीने आंदोलन

यावर्षी 2022 मध्ये भारत नदी सप्ताहाची थीम ‘पुण्यातील नद्यांचे पुनर्जीवन’ आहे. मुख्य लक्ष शाळेतील मुलांवर केंद्रित करण्यात आले आहे. मुलांना नदीचे महत्त्व कळावे, नद्यांची माहिती व्हावी आणि नद्यांसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करायला लावणे हा या उत्सवांचा मुख्य उद्देश आहे.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

Pune news

उपक्रमांचा तपशील :
1) शालेय प्रश्नमंजुषा ( 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान कोणत्याही दिवशी आयोजित केली जाणार): पुण्यातील नद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक मजेदार संवादात्मक आणि माहितीपूर्ण प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामध्ये खाजगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळा आणि पुणे महानगरपालिकेच्या (Pune news) शाळा सहभागी होत आहेत. 268 होऊन अधिक पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुले आणि इतर इंग्रजी आणि मराठी माध्यमातील चौथी, सातवी इयत्तेतील मुले प्रश्नमंजुषांमध्ये भाग घेतील.

2. प्रतिज्ञा (21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान कोणत्याही दिवशी आयोजित केली जाईल): शाळकरी मुले स्वतःची नदीसाठी प्रतिज्ञा तयार करतील ज्यामध्ये समाविष्ट असेल
अ) माझी नदी कशी असावी असे मला वाटते?
ब) मी नदी साठी काय करू शकतो?
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या प्रतिज्ञा शाळा तक्त्यावर चिकटवतील. हे तर ते 27 नोव्हेंबरच्या उत्सवात प्रदर्शित केली जातील.

3. 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान सोशल मीडिया मोहीम: तरुण पिढी ही टेक्नो आणि मीडिया जाणकार आहे. हे तरुण त्यांच्या सोशल मीडिया नेटवर्क नदी पुनर्जीवन पोस्टर्स डीपी अपलोड करतील.

4) शाळा मार्च 22 नोव्हेंबर रोजी: पुण्यातील नद्यांना भेट (Pune news) असणाऱ्या समस्या बाबत जनजागृती करण्यासाठी विविध शाळां द्वारे पद यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. शाळकरी मुले त्यांच्या शाळेजवळ हाताने बनवलेली बॅनर आणि फलक घेऊन फिरतील. सर्वोत्कृष्ट निर्मितीला एक पुरस्कार मिळेल आणि 27 तारखेला भारत नदी दिन समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल.

5. 26 नोव्हेंबर रोजी स्वच्छता मोहीम : स्वच्छ पुणे स्वच्छ भारत आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने नदीच्या निवडक भागांवर नदीकाठची स्वच्छता केली जाईल.

6. 27 नोव्हेंबर रोजी भारत नदी दिनाच्या समारोप: भारत नदी दिनानिमित्त नद्यांच्या गाण्यांसह नृत्य सादरीकरण, पुण्यातील नद्यांच्या दुर्दशेवर ” पुण्याला जेव्हा जाग येते” आणि ” नदी संपावर जाते” इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका सादर होणार आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील नद्या पूर आणि नद्या वाहत्या मोकळ्या आणि स्वच्छ राहण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल बोलणारे वक्ते यांची मांडणी केलेली आहे. सर्वोत्कृष्ट फलक/ तक्त्यासाठीचे पुरस्कार दिले क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या आणि निमंत्रितांच्या हस्ते वितरित केले जातील.

नद्यांच्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नागरिकांना पुण्यातील नद्यांची जोडण्यासाठी आणि या महत्त्वाच्या परिसंस्थेकडून आपल्याला जे काही मिळते, ते सर्व काही ‘आओ नदी को जाने’ या ध्वजाखाली 21 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत भारत नदी सप्ताह द्वारे साजरे करण्यासाठी विविध उपक्रमांचे विचारपूर्वक नियोजन केले आहे. यामध्ये विविध एनजीओ आणि संस्था एकत्र येत आहेत. 28 नोव्हेंबर रोजी भारत नदी दिवस असतो.

भारत नदी सप्ताह साजरा करण्यासाठी हात मिळवणी करणाऱ्या संस्था:
जल-बिरादरी आणि आओ नदी को जाने, इंडिया रिव्हर फोरम, स्वच्छ पुणे स्वच्छ भारत, सेफ सलीम अली, नदी सायक्लोथॉन, जस्टिन डान्स अकॅडमी जीवित नदी

एका दृष्टीक्षेपात कार्यक्रमाचे वेळापत्रक:

कार्यक्रम: तारीख: सहभागी: ठिकाण: वेळ
शालेय प्रश्नमंजुषा: 21 ते 24 नोव्हेंबर: 268+ पुणे मनपा( पीएमसी) शाळा आणि इंग्रजी आणि मराठी खाजगी शाळा : वैयक्तिक शाळा : शाळेची वेळ

प्रतिज्ञा : 21 ते 24 नोव्हेंबर : अनेक शाळा : वैयक्तिक शाळा : शाळेची वेळ

सोशल मीडिया मोहीम : 21 ते 28 नोव्हेंबर : सर्व : —- : —-

शाळा मार्च : 22 नोव्हेंबर : शाळा : — : सकाळी 9 ते 12 वा पर्यंत

क्लीनअप ड्राईव्ह : 26 नोव्हेंबर : अनेक शाळा आणि सामान्य नागरिक : नदीकाठचे निवडक भाग : सकाळी 7.30 ते 8.30 वा

भारत नदी दिन साजरा : 27 नोव्हेंबर : शाळा, निमंत्रित, मान्यवर आणि नागरिक : संभाजी पार्क : सकाळी 9 ते 11 वा

‘माय रिव्हर, माय रिस्पॉन्सिबिलिटी’ या भावनेने आणि पुण्यातील नद्यांसाठी मीडियाचा भक्कम पाठिंबा या भावनेने भारत नदी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.