Pune news: माननीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अहमदनगर ते नवीन आष्टी दरम्यान अतिरिक्त डेमू (DEMU) सेवांचे केले उदघाटन

एमपीसी न्यूज: माननीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी अहमदनगर ते नवीन आष्टी दरम्यान अतिरिक्त डेमू (DEMU) सेवांच्या उदघाटनास हिरवा झेंडा दाखवला.

रावसाहेब दादाराव पाटील दानवे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या उपस्थितीत दि. 17 नोव्हेंबर रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकावरून अहमदनगर ते नवीन आष्टी दरम्यान अतिरिक्त डेमू (DEMU) सेवांच्या शुभारंभीय ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

लव्ह-जिहाद विरोधात चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणीच्यावतीने आंदोलन

खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, विधान परीषद सदस्य, महाराष्ट्र सुरेश धस, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र बबनराव पाचपुते हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

रावसाहेब दादाराव पाटील यांनी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, अतिरिक्त डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी-अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल. ते पुणे आणि मुंबईला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल कारण प्रवाशांना 11042 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेससाठी कनेक्टिंग ट्रेन मिळू शकेल.

मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग यांनी अतिथींचे स्वागत केले तर मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज दोहरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.