Savitrabai Phule Pune University: ‘गणेश अथर्वशिर्ष’ वर आता सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सर्टीफिकेट कोर्स

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश अथर्वशिर्ष यावरील सर्टीफिकेट कोर्स सुरु करण्यात आला आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, संस्कृत व प्राकृत विभागाचे विभागप्रमुख डॉ.देवनाथ त्रिपाठी, प्रा. डॉ.दिवाकर मोहंती, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, डॉ.अ.ल.देशमुख, ज्ञानेश्वर रासने, राजाभाऊ पायमोडे, गजानन धावडे आदी उपस्थित होते.

दुकानांची तोडफोड करत व कोयते फिरवत टोळक्याची भोसरीत दहशत

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे. अर्थवशिर्षावरील कोर्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेण्याचे केले जात आहे.

डॉ. कारभारी काळे म्हणाले की, भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले आहे. या कोर्सच्या माध्यमातून भारताची परंपरा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. हा कोर्स एकच विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता सर्वच विद्यापीठात असायला हवा. मंत्राचे महत्व, शारीरिक व मानसिक फायदे लोकांपर्यंत पोहोचले, तर सर्वजण याचा मनस्वी आनंद घेतील. शिक्षणाला अध्यात्म, ज्ञान व विज्ञानाची जोड देत योग्य सांगड घालणे महत्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.