Vadgaon Maval : काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जयंती उत्सवाची सांगता

एमपीसी न्युज – पोटोबा महाराज देवस्थान कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवाचा सांगता समारंभ गुरुवारी (दि 17) वाणीभूषण ह.भ. प. गणेश महाराज वाघमारे, (ओतूर,श्री क्षेत्र ओझर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यावर दुसरे दिवशी, कार्तिक कृष्ण प्रतिपदेला या उत्सवाची सुरूवात झाली. या वर्षी देवस्थान संस्थानने, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा (कैवल्याचा पुतळा) या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन केले. उत्सव काळात भाविकांनी अभिषेक, महापूजा, आरती, कथा, हरिपाठ श्रवण सुखाचा आनंद घेतला.

कथाकार वाणीभूषण ह भ प गणेश महाराज वाघमारे यांनी कैवल्याचा पुतळा कथेचे व कालभैरव देव जन्म कीर्तनाचे सुंदर निरूपण करून येथील भाविकांना मंत्रमुग्ध केले.

महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानचे विश्वस्त, ॲड तुकाराम पंढरीनाथ काटे परिवाराच्या वतीने करण्यात आली. तसेच मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर यांच्या वतीने करण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे सचिव अनंता कुडे,किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोकराव ढमाले, ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, पुजारी समीर गुरव आदीसह ग्रामस्थांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.