Vinayak mete accident: मेंटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या कारचालकाची पोलिसांकडून चौकशी, पहा काय सांगितलं..

एमपीसी न्यूज: मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले.(Vinayak mete accident) त्यानंतर मेंटेंचा मृत्यू अपघातात झाला की त्याच्यासोबत घातपात झाला असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या गाडीचा मोठ्या व्यक्तीने पाठलाग केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकारच्या बातम्या देखील माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर संबंधित कारमालक पुण्याला असून त्याने हा पाठलाग केवळ गैरसमजातून झाल्याचं पोलिसांना सांगितला आहे.

 

विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या संदीप वीर यांची रांजणगाव पोलिसांनी चौकशी केली. मीटिंगच्या गाडीचा पाठलाग करणारी ही गाडी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील होती. त्यामुळे कारचा मालक आणि त्या दिवशी गाडीत असणारे लोक स्वतःहून पोलीस स्टेशनला आले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. यावेळी कारमालक संदीप वीर यांनी सांगितले की, आम्ही विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग जाणून बुजून केला नाही.(Vinayak mete accident) तर ते अनावधानाने झाले आहे. त्यादिवशी माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही घाईघाईने घरी निघालो होतो. यावेळी हॉर्न वाजवत स्पीडमध्ये आम्ही काही गाड्यांना ओव्हरटेक केला. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार गैरसमजातून झालेला असू शकतो अशी माहिती रांजणगावची वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली.

Chakan Fire: चाकण येथील मेटालिक फोर्जिंग कपंनीमध्ये आग

दरम्यान या कारचे मालक हे भांबर्डे गावचे रहिवासी आहेत.. यापुढेही त्यांना चौकशीसाठी बोलावलं तर ते हजर राहू शकतात असेही पोलिसांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.