Wakad : काळाखडक झोपडपट्टीतून दोन लहान मुलींसह आई बेपत्त


एमपीसी न्यूज – काळाखडक झोपडपट्टीमधून दोन लहान मुलींसह आई घरात कोणासही न सांगता बेपत्ता झाली आहे. हा प्रकार 30 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेचा पतीने वाकड पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दिली आहे.

कमला केशवसिंग सिंग (वय-25), करिष्मा (वय- सहा महिने) आणि कृतिका (वय- दीड वर्षे) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कमलाचे पती केशवसिंग दिलीप सिंग (वय-26, रा. काळाखडक झोपडपट्टी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला सिंग ही महिला आपल्या दोन लहान मुलींसमवेत घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. त्यांची उंची पाच फूट, रंग गोरा, केस काळे, मोठे नाक जातेवेळी अंगामध्ये काळ्या पांढ-या रंगाचा सलवार कुर्ता घातला असून गळ्यात लाल मण्यांची माळ आणि कानात रिंगा आहेत. तिला हिंदी आणि नेपाळी भाषा बोलता येते.

तर तिने सोबत नेलेल्या करिष्माची उंची दोन फूट, रंग गोरा, मध्यम बांधा आणि कृतिका हिची उंची दिड फूट मध्यम बांधा चेहरा गोल असे या बेपत्ता झालेल्यांचे वर्णन आहे. यांच्या विषयी कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन वाकड पोलिसांनी केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक डी.के. अढाव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.