Wakad : महिलांची छेड काढणारा चिपड्या दोन वर्षांसाठी हद्दपार

वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात तरुणी व महिलांची छेड काढून दहशतीचे वातावरण पासरविणा-या एका आरोपीला वाकड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

किशोर ऊर्फ चिपड्या बालाजी शिंदे (वय 23, रा. बापूजी बुवा नगर, थेरगाव) असे हद्दपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपड्या हा वाकड आणि परिसरातील महिला व मुलींची छेड काढत होता. त्याच्या या प्रकारामुळे महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी देखील पोलिसांकडे आल्या होत्या. त्या विरोधात पोलिसांनी गोपनीय माहिती जमा करून अहवाल तयार करून उपआयुक्त गणेश शिंदे यांच्याकडे पाठविला. पोलीस उपआयुक्तांच्या आदेशानुसार चिपड्या याला 26 जून 2018 पासून दोन वर्षां करीता पुणे जिल्हा व शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.