Wakad : मूल होत नसल्याचे नैराश्यातून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – मूल होत नसल्याच्या नैराश्यातून थेरगाव येथे विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज (सोमवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला.

प्रतीक्षा पाचपिंडे (वय 20, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. एक वर्षांपूर्वी तिचा गर्भपात झाला होता. त्यामुळे तिच्यावर मूल होण्यासाठी उपचार सुरु होते. आज सायंकाळी घरात कुणीही नसताना तिने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.