Bhosari : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणा-यास अटक; जिवंत काडतुसासह देशी पिस्तुल जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक फाट्याजवळ एका तरुणाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

रामभजन चानू रईकवार (वय 25, रा. नवी पेठ, पुणे) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना एक तरुण नाशिक फाट्याजवळ येणार आहे. त्याच्याजवळ बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तैनात करून व सापळा रचून रामभजन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे हे पिस्तुल आले कसे, पिस्तुल घेऊन नाशिक फाट्याजवळ येण्याचे कारण, याबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.