Wakad : बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील डांगे चौकाजवळ असलेल्या फेड बँक फोडण्याचा (Wakad) प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांचे इतर चार साथीदार पळून गेले असून त्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना रविवारी (दि. 9) रात्री दीड वाजता घडली.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या डायल 112 या हेल्पलाइन क्रमांकावर रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास डांगे चौक थेरगाव येथून कॉल आला. कॉल वरील व्यक्तीने काही जण बँक फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यानुसार मार्शल वरील दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी फेड बँकेच्या शेजारी असलेल्या एका दुकानाचे शटर उचकटून आठ जण बँकेची भिंत पाडण्याचा प्रयत्न करत होते. दरोडेखोरांनी बँकेची भिंत पोखरली असता त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागली. पोलीस दिसताच दरोडेखोरांनी पोलिसांवर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी चार दरोडेखोरांना पकडले. मात्र अन्य चार जण पळून गेले.

Vadgaon Maval : रामदास काकडे यांच्या प्रवेशाने मावळात कॉंग्रेसला मिळणार नवसंजीवनी

दरोडेखोरांचा प्रतिकार करत असताना वाकड पोलीस ठाण्यातील एक पोलीस अंमलदार जखमी झाले. आरोपींकडून बँक फोडणेसाठी लागणारे गॅस कटर, गॅस सिलेंडर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी अवजारे, भिंत फोडण्यासाठीचे गिरमीट असे साहीत्य जप्त करणेत आले आहे. असून अधिक तपास करीत आहोत. पळून गेलेल्या चार दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक पोलिसांची दोन पथके रवाना केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अनिल लोहार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदू गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबीले, अजय फल्ले, तात्या शिंदे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, रमेश खेडकर, विनोद सोणवणे, नागनाथ कांबळे, खोडदे, घाडगे यांनी केली (Wakad) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.