Vadgaon Maval : रामदास काकडे यांच्या प्रवेशाने मावळात कॉंग्रेसला मिळणार नवसंजीवनी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहराचे माजी उपनगराध्यक्ष व नामवंत उद्योजक रामदास काकडे यांनी काँग्रेस पक्षात परत (Vadgaon Maval) सक्रिय होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढून पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गेली कित्येक वर्षे राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या रामदास काकडे यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे.

शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, माजी अध्यक्ष दिलीप ढमाले, अध्यक्ष यशवंत मोहोळ, रोहिदास वाळुंज यांच्या उपस्थितीत काकडे यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय जाहीर केला.

मावळ तालुका हा आधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर भाजपने 25 वर्ष तालुक्याचे नेतृत्व केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. या पार्श्वभूमीवर तालुक्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एका प्रबळ नेत्याची गरज पक्षाला होती. रामदास काकडे यांच्या सारखा तगडा नेता सक्रिय होण्यामुळे काँग्रेसच्या पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, असे मानले जात आहे.

Today’s Horoscope 10 July2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

काँग्रेस हा शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने जाणारा पक्ष असून मावळच्या विकासाला गती देण्याबरोबरच  बेरोजगारी सारख्या समस्यांना नियंत्रणात आणण्यासाठी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. मागील काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त होतो, मात्र आपण कायम काँग्रेसच्या विचारधारेचे होतो. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम करणार असल्याचे रामदास काकडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

धरणांचा तालुका म्हणून ओळखला जाणारा मावळ तालुका समृध्द व्हावा, अधिक वेगाने विकासित व्हावा, एमआयडीसी आहे, तरूणांच्या हाताला काम मिळावे  रोजगार मिळावा हा उद्देश धरून काँग्रेसमध्ये जात असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ म्हणाले की, काकडे यांचा अनेक कार्यकर्त्यांसोबत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे.  त्यामुळे तालुका काँग्रेसला ऊर्जितावस्था मिळणार असल्याची चर्चा मावळ परिसरात सुरू आहे.

शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्यानंतर मावळ तालुक्यातील त्या त्या पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कुणाच्या छत्रछायेखाली काम करायचे, असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याबरोबरच मावळ तालुक्यात काँग्रेस पुन्हा एकदा एकजुटीच्या मार्गावर आहे, असे मोहोळ म्हणाले.

रामदास काकडे यांच्यासारख्या सक्षम नेत्याची ‘घरवापसी’ होत असल्याने काँग्रेसच्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण (Vadgaon Maval) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.