Wakad : पंचतारांकीत हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्रींना पाठवून सेक्स रॅकेट चालवणारा अटकेत

एमपीसी न्यूज – वाकड येथील पंचतारांकीत (Wakad) हॉटेल मध्ये एकाला पोलिसांनी वेश्या व्यवसाय प्रकऱणी अटक केले आहे. आरोपी हा भोजपुरी अभिनेत्री यांना पाठवून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात उघ़ड झाले आहे. या प्रकरणात 2 मुलींची सुटका केली आहे. ही कारावाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरुवारी (दि.11) केली.

याप्रकऱणी पोलिसांनी प्रबीर प्रकाश मुजुमदार (वय 24 रा.भारती विद्यापीठ, मुळ पश्चिम बंगाल) याला अटक केली असून वाकड पोलीस ठाण्यात त्याचे साथीदार दिनेश यादव व विराज यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनिल शिरसाठ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक बनून दलाला फोन केला. त्यानुसार हॉटेलमध्ये रुमबुक करून पीडीत मुली आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे दलालालाही अटक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 29 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पीडित मुलींमधील एक मुलगी ही भोजपुरी अभिनेत्री व एक मुलगी ही मॉडेलींग करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई  अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाठ, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने (Wakad) यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.