Wakad : कावेरीनगर सब वे मधून दुचाकी आणि रिक्षालाच परवानगी

एमपीसी न्यूज – कावेरीनगर सब वे मधून दुचाकी (Wakad) आणि रिक्षा यांनाच वाहतुकीसाठी परवानगी आहे. अन्य वाहनांना या सब वे मधून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

कावेरीनगर अंडरपास हा अरुंद असून 16 नंबरकडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याची रुंदी देखील कमी आहे. त्या ठिकाणावरून पवारनगर गल्ली व थेरगावकडे जाणारी लेन असल्याने या अंडरपासमध्ये सतत वाहतूक कोंडी होते.

Sangvi : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोकणे चौक परिसरात नो पार्किंग झोन

त्यामुळे कावेरीनगर सब वे मधून दुचाकी आणि रिक्षा व्यतिरिक्त अन्य वाहनांना (Wakad) वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. अन्य वाहनांना कावेरीनगर वेणूनगर कडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना गुजरनगर अंडरपासमधून इच्छित स्थळी जाता येईल.

तर 16 नंबरकडून वेणूनगर, कावेरीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना काळेवाडी फाटा येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.