Wakad : वाहतूक पोलिसांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियमन करत (Wakad) असलेल्या पोलिसाला मी पोलिसांना सरळ केलं आहे म्हणत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी चार वाजता पुनावळे अंडरपास जवळ घडली.

सचिन तानाजी राजपूत (वय 22, रा. कासार आंबोली, ता. मुळशी), अरुण बलराम रास्ते (वय 30) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : मृत घोडा पुरण्यावरून दोन गटात मारामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाकड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ते पुनावळे अंडरपास येथे वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करून जाधव यांना शिवीगाळ केली. कुठला पोलीस आहेस. बाजूला हो. मला पुढे जाऊ दे, अशी दमदाटी केली.

जाधव यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा (Wakad) प्रयत्न केला. आरोपीने त्याची दुचाकी रस्त्यात उभी केली. तुला माहिती नाही का, ही हद्द हिंजवडी पोलीस स्टेशनची आहे. हिंजवडी पोलिसाला विचार तू. इथल्या पोलिसांना मी सरळ केले आहे. मी येरवडा जेलमध्ये जाऊन आलो आहे. माझ्या नादी लागू नको, असे म्हणत शिवीगाळ करून पोलीस अंमलदारांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.