Pune News : बांधकाम साइटवर वीट डोक्यात पडून महिलेचा मृत्यू, ठेकेदार असलेल्या नव-याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बांधकाम साइटवर काम सुरू असताना विटा भरून देण्याचे काम करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दुसऱ्या मजल्यारून विट पडल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय. याप्रकरणी हलगर्जीपणा करणारा ठेकेदार आणि तिच्या पतीविरोधात बांधकामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संतोष नगर येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. 

अंजुबाई नारायण पवार असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी या महिलेचा आणि ठेकेदार नारायण शिवा पवार त्याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अनिल भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नारायण पवार याने संतोष नगर येथील स्वामी समर्थ मोठा जवळ चालू असलेल्या एका इमारतीचे वीट व प्लास्टर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. या बांधकाम साईटवर तो पत्नी अंजुबाईसह काम करत होता. मंगळवारी पती-पत्नी दोघेही या ठिकाणी काम करत होते. अंजूबाई या खालून विटा भरून वर पाठवत होत्या. यावेळी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलेली एक वीट अंजूबाई यांच्या डोक्यात पडली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या सर्व प्रकरणानंतर या कामाचा ठेका घेतलेल्या नारायण पवार यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना हेल्मेट दिले नाही संरक्षक जाळी बसवली नाही आणि बांधकामाच्या ठिकाणी हायगयी केल्याचे दिसून आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.