zika : पुण्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण, संसर्गाला पिंपरी-चिंचवडचे कनेक्शन ?

एमपीसी न्यूज – पुण्यातील येरवडा परिसरात एका 64 वर्षीय ज्येष्ठ ( zika) महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. संबंधीत महिलेने पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका सांस्कृतिक कार्यकमाला हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आल्याने या संसर्गाला पिंपरी-चिंचवडचे कनेक्शन तर नाही याचा आता तपास घेतला जात आहे. तसेच संबंधित महिला ही काही दिवसांपुर्वी केरळला गेल्याचेही समोर आले आहे.

Whale Fish : रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल माशाचा अखेर मृत्यू

संबधीत महिला ही येरवाड्यातील प्रतिकनगर परिसरात राहत असून आरोग्य ( zika) विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला या महिलेने हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला.

तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत अखेर झिकाचे निदान झाले. दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तसेच ती काही दिवासांपूर्वी केरळला ही गेल्याचे समोर आले आहे.

तिला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता,  रक्ताचा नमुना 10 नोव्हेंबर ला NIV ला पाठवला होता. 11 नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी ( zika)  घेतले आहे, त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.
– डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.