Whale Fish : रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल माशाचा अखेर मृत्यू

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल माशाचा ( Whale Fish) अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत जवळपास पाच वेळा रेस्क्यूचे प्रयत्न केल्यांतर या 30 फुटी व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यात आलं होतं. मात्र 15 नोव्हेंबरला संध्याकाळी ते पुन्हा समुद्रकिनारी आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माशाला जीवनदान देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरु होते. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

Savitribai Phule Pune University : वादावादी झालेल्या संघटनांमध्ये विद्यापीठ घडवून आणणार समेट

तब्बल 40 तास रेस्क्यू ऑपरेशन करून गणपतीपुळेच्या समुद्रात सोडण्यात आलेले व्हेल माशाचे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले होते. बराच वेळ ते पाण्याबाहेर राहिल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. व्हेल माशाला जिवंत समुद्रात सोडण्याचं देशातील हे पहिलंच रेस्क्यू ऑपरेशन होतं.

तब्बल दोन दिवस हे बाचवाकार्य सुरु होतं. रात्री उशिरा व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सुखरुप सोडण्यात आलं. मात्र पुन्हा ते समुद्रकिनारी आले होते. अखेर त्याचा  मृत्यू झाला ( Whale Fish) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.