Pune : तूर्तास पुण्यात झिकाचा एकही रुग्ण नाही – पुणे महापालिका

एमपीसी न्यूज – झिका ग्रस्त महिलेच्या प्रकृतीत चांगला सुधार झाला (Pune)असून तिच्यापासून संसर्गाचा धोका देखील टळला आहे. शिवाय तिच्या घरच्यांनाही लागण नसल्यामे तुर्तास तरी पुण्यात एक ही झिका चा रुग्ण नसल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी (दि.24) स्पष्ट केले.

पुण्यात 15 नोव्हेंबर रोजी येरवड्यातील 64 वर्षाच्या महिलेला(Pune) झिकाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. ती महिला केरळवरून प्रवास करून पुण्यात आली होती. त्यामुळे तेथे झिका चा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

 

Pune : वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांची पुन्हा बदली

त्या महिलेला ताप, थंडी, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे केलेल्या रोगनिदान चाचण्यांमधून रुग्णाला झिका विषाणूंचा संसर्ग असल्याचे निदान झाले. याचे अचूक निदान करण्यासाठी रुग्णाचे रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले तेथे हा झिका व्हायरस आहे यावर शिक्का मोर्तब झाले.

याविषयी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले की, झिका विषाणूंचा संसर्ग झालेल्या महिलेची प्रकृती आता सुधारली आहे. त्यामुळे त्यांच्यापासून रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आता कमी आहे.

तसेच रुग्णाच्या घरातील पाचही सदस्यांचे रक्तनमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आले. तसेच, रुग्ण आढळलेल्या भागापासून दोन ते अडीच किलोमीटर परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ताप, सर्दी, खोकल्याचे चार रुग्ण आढळले. झिका रुग्ण आढळलेल्या भागात राहणारे हे नागरिक असल्याने त्यांचे ही रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले. या नऊ रुग्णांना झिका विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याची ‘एनआयव्ही’तर्फे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तुर्तास तरी शहरात एक ही झिका चा रुग्ण नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.