Pune: बारामती मध्ये उद्या रंगणार पहिली बारामती पॉवर मॅरेथॉन

एमपीसी न्यूज – येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपन्न (Pune)होणाऱ्या बारामती पॉवर मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात असून ,  तालुका पातळीवर प्रथमच वर्ल्ड ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

 

प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉन साठी पात्रता निकष म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य धरली जाणार आहे.

मॅरेथॉनला पहाटे 4 वाजता सुरुवात होणार असून  (Pune)सांगता सकाळी 8 वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , कृषी मंत्री धनंजय मुंडे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार , ऑक्सिरीच ब्रँडचे प्रमुख पुनीत बालन , अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव आदींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

PMPML: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीएमएल चालक – वाहकांवर होणार निलंबनाची कारवाई
सहभागी स्पर्धकांना बारामतीचा सर्वांगीण विकास अनुभवत , फ्लॅट ट्रॅकमुळे सर्वोत्तम टायमिंग साधण्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. 42 किमी , 21 किमी ,10 किमी आणि 5 किमी फन रन या कॅटेगरी मध्ये स्पर्धक सहभागी होणार आहेत. रनिंग कॅटेगरी आणि वयोगटानुसार 8 लाखांची बक्षिसे या मॅरेथॉनसाठी निर्धारित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार संपन्न होणाऱ्या या मॅरेथॉन साठी देशभरातील 28 राज्यांतून 2 हजारावून अधिक धावपट्टूनीं नाव नोंदणी केलेली आहे. त्यापैकी प्रामुख्याने अल्ट्रामॅन आयपीएस कृष्णप्रकाश , ५ वेळेस लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नावे असलेल्या सुफीया खान , डेका मॅन पूर्ण करणारे एकमेव भारतीय रनर प्रशांत हिप्परगी , वयाच्या 65 व्या वर्षी अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे दशरथ जाधव आणि NDA एन.डी.ए मॅरेथॉन विजेता निशु कुमार यासोबतच देशभरातील दिग्गज धावपट्टू सहभागी होणार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.