Pune: विद्यार्थिनीशी अश्लिल वर्तणूक करणाऱ्या खासगी क्लासेसच्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीशी (Pune)अश्लील वर्तन करणाऱ्या खासगी क्लासेसच्या प्राध्यापकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमित सिरमनवर (वय 28, रा. बालेवाडी) असे गुन्हा (Pune) दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ती मॉडेल कॉलनीतील एका संस्थेत जायची. आरोपी सिरमनवरने तरुणीशी अश्लील वर्तन केले. तिला छडी मारुन घरातील कामे करण्यास सांगितले.

PMPML: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीएमएल चालक – वाहकांवर होणार निलंबनाची कारवाई

तरुणीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून, शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.