PMPML: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीएमएल चालक – वाहकांवर होणार निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल च्या चालक व वाहकांना वाहतूकीच्या नियमाबाबत (PMPML)सुचना देण्यात आल्या असून जे चालक व वाहक य़ाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर परीवहन महामंडळातर्फे थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशे महामंडळाने जाहीर केले आहे.

या तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाईलवर बोलुन बसेस चालविणे,(PMPML) झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे,रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे इ. तक्रारीचा समावेश आहे.

Pune : वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांची पुन्हा बदली

महामंडळाकडील चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होणाच्या द्दष्टीने महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सूचना दिल्या आहेत कि, बस चालवताना करतना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरित्या करणे, धुम्रपान करण्यात येऊ नये, बसेस बस स्टॉपवर लगत उभ्या करण्यात याव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करणे, भरधाव वेगाने बसेस संचलन करू नये अशा विविध प्रकारच्या सुचना दिलेल्या आहेत.

तरी यापुढे वरील नियमांचे पालन न केल्यास सदरील तक्रारीचे शहानिशा करून संबंधित चालक-वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.