Pune : वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांची पुन्हा बदली

एमपीसी न्यूज: अंतरवाली सराटी येथील लाठीमारामुळे वादग्रस्त ठरलेले आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांची (Pune) पुन्हा बदली करण्यात आली आहे.

तुषार दोशी यांची काही दिवसांपूर्वीच पुण्याचे CID अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. आता त्यांची पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Pune : उद्योग अनुभव प्रतिष्ठानचे उद्योगभूषण व उद्योगदीप्ती पुरस्कार जाहीर

जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये एक सप्टेंबरला (Pune) लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोषी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यानंतर दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच दोशी यांची पुण्याचे CID पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
पण अचानक काल पुन्हा त्यांची बदली करण्यात आली.

तुषार दोशी यांची बदली रोखण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले होते. तरी देखील दोशी यांची बदली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.