Pune : उद्योग अनुभव प्रतिष्ठानचे उद्योगभूषण व उद्योगदीप्ती पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – उद्योगवृद्धी व उद्योजकता विकासात उल्लेखनीय (Pune) कामगिरी करणार्‍या विविध आठ उद्योजकांना उद्योगभूषण व उद्योगदीप्ती पुरस्कार येत्या रविवारी दि.26 नोव्हेंबर 2023 रोजी कोथरुड येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात प्रदान केले जाणार आहेत. याबाबतची माहिती उद्योग अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई, संस्थापिका श्‍वेता गानू व पुणे शाखेचे उपाध्यक्ष विकास दांगट यांनी दिली.

येत्या रविवारी सकाळी 10.30 वाजता होणार्‍या कार्यक्रमास एअर मार्शल हेमंत भागवत, चितळे डेअरीचे गिरीश चितळे व पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदाचे 10 वे वर्ष असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप आहे.

Nigdi : मधुकर पवळे यांना अभिवादन

यावेळी प्रभुदेसाई यांनी पुरस्कार जाहीर करताना (Pune) सांगितले की, यावर्षी उद्योगभूषण प्रथम पुरस्कार – मारुती पवार (अ‍ॅम्पट्रॉनिक्स टेक्नो, खोपोली), द्वितीय पुरस्कार – विनोद सातव (लीड मिडीया अँड पब्लिसिटी, पुणे), लघु व मध्यम उद्योगभूषण प्रथम पुरस्कार – रवींद्र नाकिल (स्काय इंडस्ट्रीय, इचलकरंजी), द्वितीय पुरस्कार – संजय खरे (स्व टेक्नॉलॉजिस, नवी मुंबई), उद्योगदीप्ती पुरस्कार – भक्ती मायाळू (सिने-नाट्य संपादिका, निर्माती), उद्योगदीप्ती दिव्यांग पुरस्कार – अनघा मोडक (आकाशवाणी निवेदिका), उद्योगदीप्ती स्टार्टअप पुरस्कार – ऋतिका वाळंबे (पुस्तकवाले, पुणे) व उद्योगदीप्ती अनिवासी भारतीय पुरस्कार – पुर्णिमा कर्‍हाडे (साऊलफुडस्, अमेरिका) यांना प्रदान केले जाणार आहेत.

यावेळी श्‍वेता गानू म्हणाल्या की, उद्योजकांमध्ये उद्योगवृध्दी व उद्योजकता विकासात वाढ होण्यासाठी आमचे प्रतिष्ठान गेली 10 वर्षे काम करीत आहे. त्यासाठी सातत्याने उद्योजकांशी संवाद साधण्यात येतो, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देऊन अडीअडचणी सोडवण्याबरोबरच कामगिरी उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.