Pune – पुणे एसएफए चॅम्पियनशीपच्या चौथ्या दिवशी अथलेटिक्स आणि बुद्धीबळ स्पर्धांचा जोश

एमपीसी न्यूज – एसएफए चॅम्पियनशीपच्या चौथ्या दिवशी श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अथलेटिक्स आणि (Pune) बुद्धीबळाची उत्सुकता अनुभवण्यास मिळाली. आज मैदानावर सात खेळांमध्ये मिळून 2074 खेळाडूंनी भाग घेतला.

बॅडमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, कराटे, थ्रोबॉल, अथलेटिक्स आणि बुद्धीबळ या खेळांचा त्यात समावेश होता.

वैविध्यपूर्ण खेळांच्या या पार्श्वभूमीवर अनुभवी बास्केटबॉल प्रशिक्षक फैझान शेख यांनी एसएफए चॅम्पियनशीपचा लक्षणीय प्रभाव पडत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, ‘एसएफएने क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे, जो शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आणि आवड निर्माण करेल. लहान वयातच खेळाची आवड निर्माण करून, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्यांचा विकास केला जाईल.’

25 नोव्हेंबर रोजी पाचवा दिवस #SheisGold चं स्पिरीट साजरा करणारा आहे. #SheisGold हा एसएफए चॅम्पियनशीप्सचा खास उपक्रम असून त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रातील कुशल मुलींना उद्याचे चॅम्पियन्स बनवण्यासाठी सक्षम केले जाणार आहे.

क्रीडा स्पर्धा नव्या उंचीवर पोहोचत असतानाच जिमनॅस्टिक आणि व्हॉलीबॉल स्पर्धांनाही सुरुवात झाली, तर बुद्धीबळप्रेमी अंतिम फेरीच्या उत्सुकतेमध्ये आहेत.

एसएफए चॅम्पियनशीप्स देशातील तरुण खेळाडूंसाठी खेळ सहजपणे (Pune) उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून आजच्या गुणवत्तेचे उद्याच्या विजेत्यांमध्ये रुपांतर करण्याचे ध्येय आहे.

Pune : उद्योग अनुभव प्रतिष्ठानचे उद्योगभूषण व उद्योगदीप्ती पुरस्कार जाहीर

स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) आणि व्हायकॉम18 यांनी देशभरातील क्रीडा चाहत्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा सहज उपलब्ध करून देण्यासाठी भागिदारी केली आहे.

व्हायक18 एसएफए चॅम्पियनशीपमधील सर्वात चांगले क्षण 3 डिसेंबरपासून जिओसिनेमा, स्पोर्ट्स 18-2 आणि स्पोर्ट्स 18 खेळवर दाखवणार आहे.

दैनंदिन वेळापत्रकानुसार, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.