Today’s Horoscope 25 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग -Today’s Horoscope 25 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – शनिवार

तारीख -25.11.2023

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – 9.00 ते-10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – अश्विनी 14.56 पर्यंत नंतर भरणी.

चंद्र राशी – मेष.
—————————–
मेष – ( शुभ रंग – मोरपंखी)
आजचा दिवस थोडा धावपळीचा राहील. काम कमी व दगदगच जास्त होईल. एखादा विवाह जुळवण्यास आज तुम्ही मध्यस्थी कराल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक मनाजोगती असली तरीही आज अनावश्यक खर्च टाळायला हवेत. दूरचे नातलग आज संपर्कात येतील. प्रवास घडतील.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्तच असेल नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

कर्क – ( शुभ रंग – मोतिया)
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणे योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. किरकोळ तब्येतीच्या तक्रारी ही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

सिंह -( शुभ रंग – डाळिंबी)
सहज काही मिळाले नाही तरी आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ चांगले मिळेल. सज्जनांचे पाय घराला लागतील. आज वडीलधाऱ्यांना दुखावू नका.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेच धाडस नको. नाकासमोर चालणे हिताचे राहील.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)
कौटुंबिक सदस्यात समजूतदारपणा राहील. जोडीदाराला अभिमान वाटण्यासारखी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा आज तुम्ही यशस्वीपणे सामना कराल.

वृश्चिक ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आज तब्येत थोडी नरमच असेल.

धनु (शुभ रंग- आकाशी)
काही रसिक व हौशी मंडळी कामावर दांडी मारूनही आज मौज मजेला प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

मकर (शुभ रंग- पांढरा)
मुलांची शाळेतील कामगिरी आज कौतुकास्पदच राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडू शकेल. आज तुम्ही मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

कुंभ – (शुभ रंग- केशरी)
आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

मीन ( शुभ रंग- निळा)
आज अपेक्षेपेक्षा जास्तच काही पदरात पडेल. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर चांगला प्रभाव राहील. काही येणी असतील तर ती न मागता वसूल होतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.