Nigdi : मधुकर पवळे यांना महानगरपालिकेकडून अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Nigdi) वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Railway : खडकी रेल्वे स्थानकाजवळील फाटक दोन दिवस राहणार बंद

यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्या सुमन पवळे, सामाजिक कार्यकर्ते ओंकार पवळे, राजू सावंत, प्रदिप पाटील, पंकज बागडे, जयप्रकाश गावडे,सुनिता लांडे, नलिनी साळी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.