Railway : खडकी रेल्वे स्थानकाजवळील फाटक दोन दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर (Railway) खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. यामध्ये रेल्वे गाड्यांच्या वेळेत सुसूत्रता आणण्यासाठी स्वयंचलित सिग्नलिंगचे काम असणार आहे. या कामासाठी शनिवारी (दि. 25) आणि रविवारी (दि. 26) खडकी रेल्वे स्थानकाजवळील दोन फाटक बंद राहणार आहेत.

शनिवारी रात्री 08.20 पासून रविवारी सायंकाळी 06.20 या कालावधीत हे फाटक बंद राहतील. या कालावधीत रेल्वे (Railway) फाटकांजवळच असलेला भुयारी मार्ग आणि रोड ओव्हर ब्रीज रस्ता वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून वापरता येईल.

Alandi : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

दोन दिवस चालणा-या या कामांमुळे सिंहगड, कोयना, डेक्कन, डेक्कन क्वीन यांसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्या वळवण्यात आल्या तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत. पुणे-लोणावळा दाम्र्यान असणारी लोकल सेवा देखील दोन दिवस विस्कळीत होणार आहे. शनिवारी 15 तर रविवारी 31 लोकल गाड्या रद्द असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.