Alandi : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र आळंदी येथे 5 ते 12 डिसेंबर या (Alandi) कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. यानिमित्त अलंकापुरीत लाखो वारकरी, भाविक येण्याची शक्यता आहे. आळंदी येथे आलेलेल वारकरी देहूगाव आणि भंडारा डोंगर येथेही दर्शनासाठी जात असतात. त्या पार्श्वभूमीवर दिघी-आळंदी, देहूरोड, तळवडे, चाकण वाहतूक विभागातील वाहतूक वळविण्यात आली आहे.

5 ते 12 डिसेंबर या कालावधीतील वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे –

मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरी चौक मार्गे चोविसावाडी, विश्रांतवाडी, भोसरी मार्गे
भोसरी चौक, मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी मार्गे
मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे

भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरी चौक मार्गे चोविसावाडी, विश्रांतवाडी, भोसरी मार्गे
भोसरी चौक, मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी मार्गे
मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे

चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरी चौक मार्गे चोविसावाडी, विश्रांतवाडी, भोसरी मार्गे
भोसरी चौक, मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी मार्गे

आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद – Alandi

पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरी चौक मार्गे चोविसावाडी, विश्रांतवाडी, भोसरी मार्गे
भोसरी चौक, मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी मार्गे

चाकण-वडगाव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयाळी – मरकळगाव मार्गे

मरकळ मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – धानोरी फाटा – चऱ्होली फाटा मार्गे भोसरी, विश्रांतवाडी

पुणे-दिघी मॅगझीन चौक मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – भोसरी मार्गे मोशी चाकण
अलंकापुरम जय गणेश साम्राज्य चौक मार्गे चाकण
च-होली फाटा धानोरी फाटा मार्गे मरकळ पुणे

Maval : अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा; श्रीरंग बारणे यांची सूचना

देहूगाव कमान (जुना पुणे मुंबई महामार्ग) येथून देहूगाव कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग – भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी नगर ते तळवडे गावठाण कॅनबे चौक खंडेलवाल चौक येथून देहूगाव

महिंद्रा सर्कलकडून फिजिक्स कॉर्नर अथवा कॅनबे चौक आयटी पार्क चौक हा रस्ता चाकण कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी बंद फक्त तळवडे ते आयटी पार्क ते महिंद्रा सर्कल असा वनवे मार्ग सुरू आहे.

पर्यायी मार्ग – महिंद्रा सर्कल ते निघोजे, मोईफाटा मार्गे डायमंड चौक

तळेगाव चाकण रोडवरील देहू फाटा येथून देहूगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहतूक बंद
पर्यायी मार्ग – एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

देहू कमान ते 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था

  • तळेगाव इंदोरी कडून येणारी वाहने – बायपास रोडवर देहूगाव गायरान मैदान ओम डेव्हलपर्स प्लॉट
  • तळवडे व कॅनबे आयटी चौकाकडून येणारी वाहने – खंडेलवाल चौक ते डाव्या बाजूकडून परंडवाल चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडवर व आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर
  • वडगाव कडून येणारी वाहने – वडगाव चौक आळंदी शौचालया जवळील नगरपरिषद पार्किंग
  • चाकण आळंदी फाट्याकडून येणारी वाहने – इंद्रायणी हॉस्पिटल समोर
  • आळंदी तसेच चिंबळी फाट्याकडून येणारी वाहने – बोपदेव चौकाजवळील मुंगसे पार्किंग
  • देहुगाव मोशी हवालदार वस्ती फाट्याकडून येणारी वाहने – वहिले पार्किंग व ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव आणि कचरे हॉस्पिटल गाथा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने पार्क करता येतील.
  • आळंदी येथून जाणाऱ्या एसटी व पीएमपीएमएल बस थांबे
  • योगीराज चौकातून सर्व ठिकाणी जाण्याकरिता फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस साठी बस थांबा करण्यात आला आहे.
  • डुडुळगाव जकात नाका येथे देहूगाव कडे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि पीएमपीएमएल बससाठी थांबा करण्यात आला आहे.
  • चऱ्होली फाटा येथे पुणे बाजूकडे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि पीएमपीएमएल बससाठी थांबा करण्यात आला आहे.
  • हा वाहतूक बदल पाच डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत असेल दरम्यान दिंडीतील वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना प्रवेश दिला जाईल.
  • आपत्कालीन परिस्थितीत श्री ज्ञानेश्वर मंदिरातून पान दरवाजा ते संत कबीर बुवा मठासमोरून राम घाट, इंद्रायणी नदी घाटाकडे जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.