१३ एप्रिल : दिनविशेष

What Happened on April 13, What happened on this day in history, April 13. See what historical events occurred, which famous people were born and who died on April 13.

१३ एप्रिल : दिनविशेष

१३ एप्रिल – महत्वाच्या घटना

  • १६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
    १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
    १८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
    १९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
    १९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
    १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
    १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

१३ एप्रिल – जन्म

  • १७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)
    १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)
    १९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.
    १९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.
    १९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)
    १९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.
    १९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.
    १९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.

१३ एप्रिल – मृत्यू

  • १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)
    १९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)
    १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)
    १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.
    १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.
    २०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.
    २००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.